माहीला पाहून खुश झाला 103 वर्षांचा सुपरफॅन! धोनी अन् CSK कडून मिळालं स्पेशल गिफ्ट…

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाची मोठी लोकप्रियता आहे(superfan bldc). जगभरातील लोकप्रिय क्रीडा संघांमध्ये या संघाचे नाव येते. यामागे या संघाकडून खेळणारा एमएस धोनी हे एक मोठे कारण आहे.

भारताचा आणि चेन्नईचा माजी कर्णधार असलेल्या धोनीचा मोठा(superfan bldc) चाहतावर्ग जगभरात आहे. त्याचमुळे क्रिकेट चाहत्यांकडून चेन्नई संघालाही प्रेम मिळते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धोनी आणि चेन्नई संघाच्या एका १०३ वर्षीय चाहत्याचा व्हिडिओ समोर आला होता. या चाहत्याचे नाव एस रामदास आहे.

या आजोबांनी सांगितले होते की ते आयपीएलचे सामने सुरुवातीपासून पाहात आहेत आणि त्यांना ते आवडतात. पूर्वी ते ब्रिटिश आर्मीमध्ये कामाला होते. ते क्रिकेटही खेळायचे पण चेंडू लागेल अशी भीती वाटत असल्याने ते गोलंदाजी करायचे.

दरम्यान, आता या आजोबांना धोनीने एका खास गिफ्ट पाठवले आहे. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की एस रामदास यांचे नाव लिहिलेली आणि त्यांच्या १०३ वयाचा क्रमांक लिहिलेल्या चेन्नईच्या जर्सीवर धोनीने त्याची स्वाक्षरी केली आणि त्यावर तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद असा संदेशही लिहिला आहे.

ही जर्सी नंतर एस रामदास यांना भेट म्हणून देण्यात आली. यानंतर एस रामदास यांनी आनंदही व्यक्त केला आहे. दरम्यान, या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. दरम्यान, चेन्नई संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांची आयपीएल 2024 च्या हंगामात संमिश्र कामगिरी झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे सध्या चेन्नई 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा :

बिग बी यांची एक पोस्ट आणि राजकीय वातावरण तापलं

अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना…- हायकोर्ट