महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांने निवडणूक आयोगाने केल्या ‘या’ मागण्या!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक(political) आयोगाचं पथक दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यादरम्यान काल त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आहे. अशातच आज दुपारी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर मुख्य निवडणूक(political) आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि त्यावर आयोगाची भूमिका राजीव कुमार त्यांनी स्पष्ट केलं आहे.
– 26 नव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
– ठाणे, मुंबई व पुणे भागात कमी मतदान होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
– महाराष्ट्रात महिला मतदार वाढवण्यात आयोग यशस्वी झाले आहे.
– याशिवाय राज्यातील 350 मतदान केंद्रावर तरुण अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
– पैशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
– शहरातील मतदान केंद्रावर 100 % सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
– दिव्यांग वृद्धांसाठी व्हीलचेअरची देखील सोय करण्यात येणार आहे.
– महाराष्ट्र्रातील 320 सीमेवर तपासणी केली जाणार आहे.
– जिथं लांब रांगा असतील तिथे आसन व्यवस्था देखील केली जाणार आहे.
– मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असणार आहे.
हेही वाचा :
भूमिका देणार म्हणून झोपायला…; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ!
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार?
जात पंचायतीचा अजब कायदा! सासऱ्याने प्रेमविवाह केल्यामुळे सुनेला सुनावली शिक्षा