१५ वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी, उपचारादरम्यान मृत्यू
लातूरमध्ये पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीने वसतीगृहाच्या इमारतीवरून(treatment) उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरात पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने(treatment) राहत असलेल्या वसतीगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबाने आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठी गर्दी केली आहे.
या प्रकरणी मुलीच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली आहे. मात्र गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. तर दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी देखील भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा मृत्यू होऊन 48 तास झाले आहेत तरी देखील नातेवाईक मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
झटपट बनवा चविष्ट नाश्त्यासाठी ‘एग पराठा’ – सोपी रेसिपी
थायरॉईडचे आरोग्य टिकवण्यासाठी ‘हे’ पदार्थ तुमच्या थाळीत हवेत!
बाळाच्या अभिनयाने जिंकलं वडिलांचं मन, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक!