ई-स्कुटरवर चक्क १५००० हजारांची सूट, भन्नाट ऑफर्ससह OLAची एंट्री
ओला इलेक्ट्रिक स्कूटर(e-scooter) खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने आपल्या S1 स्कूटरच्या संपूर्ण रेंजवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.
‘ओला इलेक्ट्रिक रश'(e-scooter) नावाच्या या मोहिमेअंतर्गत तुम्ही तब्ब्यत १५ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. २६ जूनपर्यंत चालू असलेल्या या ऑफरमध्ये अनेक फायद्यांचा समावेश आहे.
ऑफर्स
ओला S1 X+ स्कूटरवर थेट ५,००० रुपयांची सूट.
क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी केल्यावर ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक.
क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी करताना ५,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस (Exchange Bonus).
या ऑफर्सचा लाभ फक्त S1 X+ वरच नाही तर S1 Pro आणि S1 Air वर देखील मिळतो. या दोन्ही स्कूटरवर ५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि मोफत ओला केयर+ सबस्क्रिप्शन (Ola Care+ Subscription) मिळते. या सबस्क्रिप्शनमध्ये दरवर्षी मोफत चाचणी, घरापासून गाडी घेऊन जाणे आणि आणणे, अतिरिक्त सामान, चोरी संरक्षण आणि रस्त्यावरील मदत यांचा समावेश आहे.
दुचाकी खरेदी करताना हमखास विचार केला जाणारा मुद्दा म्हणजे बॅटरीची वाॅरंटी (Warranty). ओला याबाबतीतही तुम्हाला निराश करणार नाही. कंपनी संपूर्ण S1 स्कूटर रेंजवर आठ वर्षे किंवा ८०,००० किलोमीटर वाॅरंटी मोफत देते. याशिवाय तुम्ही अतिरिक्त वाॅरंटी खरेदी करून वॅरंटीचा कालावधी वाढवू शकता.
यंदाच्या या ऑफर्स खूपच बेस्ट आहेत. त्यामुळे जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही नक्कीच या ऑफर्सचा विचार करू शकता.
ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करणार 40 टक्के वाढणार उत्पादन : शरद पवार
धक्कादायक! पतीने पाय दाबून दिले नाहीत म्हणून पत्नीने…
GST परिषदेत महत्वाचे निर्णय! वसतिगृहे, दुधावर एकच कर