मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या वडिलांनीही संपवलं जीवन

मोबाईल.. आजच्या युगात आपल्याच शरीराचा एक भाग झालेलं हे गॅजेट.(mobile phone) लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल दिसतो, बरेच लोका सकाळपासून संध्याकाळापर्यंत मोबाईलमध्ये गुंतलेलं दिसतात, एवढं त्याचं व्यसन लागलेलं असतं. पण याच मोबाईलच्या मोहापायी एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच हृदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे. वडिलांकडे मोबाईलचा तगादा लावत त्या वेडापायी एका 17 वर्षांच्या मुलाने त्याचं मौल्यवान आयुष्य संपवलं, मोबाईलसाठी त्या मुलाने आत्महत्या केली.

मात्र त्या कुटुंबाचं दुर्दैवं तेवढंच नव्हतं तर मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे वडील एवढे हादरले की त्यांनीही टोकाचा निर्णय घेतला. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहून त्याच्या वडिलांनीसुद्धा आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून कुटुंबावर तर (mobile phone)दुहेरी मृत्यूमुळे दु:खाचा जबर पहाड़ कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या बिलोली तालुक्यातील एका गावात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मोबाईलसाठी 17 वर्षांच्या मुलाने जीव सोडला. घरातील खोलीत गळफास घेऊन त्याने त्याचं अमूल्य आयुष्य संपवलं. मात्र हेप पाहून घरातले हादरलेच.

मात्र मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या वडिलांनीही शेतात जाऊन गळफास लावून घेतला आणि स्वत:चं जीवन संपवलं. 17 वर्षांच्या त्या मुलाने मोबाील घेऊन देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. पण मोबाईल मन मिळाल्याने त्याने आत्महत्या केली, मुलाच्या जाण्याचाने दु:खी झालेल्या वडिलांनीही तोच मार्ग अवलंबला आणि कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटून त्यांनीही आयुष्याचा शेवट केला. ओमकार (mobile phone)पैलवार, राजू पैलवार असे आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. यामुळे कुटुंबाला प्रचंड धक्का बसला असून गावातही खळबळ माजली आहे. मोबाईलच्या वेडापायी अनमोल असं आयुष्य संपवणाऱ्या मुलाबद्दल आणि त्याच्या मृत्यूनंतर तोच मार्ग अवलंबणाऱ्या त्या पित्याबद्दल सर्वांनाच दु:ख होत असून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ प्रकरणावर अजितदादा भडकले, सुरेश धस यांना दिला थेट प्रत्युत्तर!

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारण…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता परीक्षा केंद्रावर…