धक्कादायक ! आरोग्य केंद्रात 19 विद्यार्थिनींचा विनयभंग; टवाळखोर भिंतीवरून चढून आत आले अन्…

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतरही अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. असे असतानाच गोंदिया जिल्ह्यातील भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गावातील टवाळखोर मुलांनी नर्सिंगच्या एक-दोन नव्हेतर 19 विद्यार्थिनींचा(students) विनयभंग केला. ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनी(students) प्रशिक्षण घेत असून, त्याठिकाणी निवासी आहेत. गेल्या महिन्याभरापासून आरोग्य केंद्र परिसरात त्या वास्तव्यास असून, शुक्रवारी (दि.7) रात्री प्रशिणार्थी मुली आपल्या क्वॉर्टरकडे जात असताना गावातील काही टवाळखोरांनी परिसरातील आरोग्य केंद्राची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. तसेच संबधित मुलींना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला.

दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील डॉक्टर व नर्सेस आणि सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचताच टवाळखोर युवकांनी पळ काढला.

यानंतर गोंदिया येथील नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी दिली आहे. या अशा प्रकाराने भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या विद्यार्थिनी(students) चांगल्याच घाबरल्या आहेत. पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाई कडक कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचारप्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण, त्या वाईट प्रवृत्तीने तरुणीला प्रथम ‘ताई’ अशी आपलेपणाने हाक मारून तिच्या मनात सुरक्षितता निर्माण केली अन् तिच्याशी बोलणे वाढविले. तिचा विश्वास मिळवून तिला त्या बसपर्यंत नेल्याचे तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून दिसत आहे. ही धक्कादायक घटनेसोबतच सुसंस्कृत शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता “ती” सुरक्षित नाही असेच दिसत असून, गेल्या सव्वा महिन्यात विनयभंगाच्या १२५ घटना घडलेल्या आहेत. तर अत्याचाराराचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

युजवेंद्र चहलला “गर्ल”फ्रेंडसोबत पाहून धनश्रीची क्रिप्टिक पोस्ट

सुनीता विल्यम्सबाबत मोठी बातमी, ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार