27 वर्षीय तरुणीवर 7 जणांनी केला बलात्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश

पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर (including)आला असून भूतानमधून आलेल्या 27 वर्षीय परदेशी तरुणीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

माजी पदाधिकारी आणि मित्रांचा गुन्ह्यात सहभाग-
पीडित महिला 2020 पासून पुण्यात राहत असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याचा समावेश असून त्याचे नाव शंतनु कुकडे असे आहे. त्याच्यासोबत ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड. विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(including) पोलिसांनी यापैकी सात जणांना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे.
शंतनु कुकडे याच्यावर याआधी देखील दोन वेगवेगळ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण नोंदवले गेले आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान या नव्या घटनेची माहिती समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेचच कारवाई करत आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मैत्रीच्या आडून अत्याचार-
भूतानमधून आलेली ही महिला बोधगया येथे 2020 साली भारतात आली होती. पुढील शिक्षण आणि नोकरीसाठी ती पुण्यात स्थायिक झाली. यावेळी तिची ओळख ऋषिकेश नवले (including)याच्याशी झाली आणि त्यानेच तिची ओळख शंतनु कुकडे याच्याशी करून दिली. कुकडे याने तिला पुण्यात राहण्यासाठी घर दिले आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. परंतु ह्याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
नंतर कुकडेने पीडितेची ओळख आपल्या इतर मित्रांसोबत करून दिली. पार्टीच्या निमित्ताने हे सर्व आरोपी वारंवार तिच्या घरी येत असत. यातील एकजण डीजे असून दुसरा पेशाने वकील आहे. लोणावळा, रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली आरोपींनी तिच्यावर पाळत ठेवत वेळोवेळी अत्याचार केले. मैत्रीचे नाटक करीत तिचा विश्वासघात करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा :
घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?
ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय?, जाणून घ्या काय आहे हा प्रकार
ग्रामपंचायत ते नगरविकास, सामान्यांसाठी मंत्रिमंडळाची मोठी भेट! ९ निर्णय झाले
खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर… Video Viral