सुसाट रिक्षातून ३ विद्यार्थिनी पडल्या; एकीचा जीव गेला
हिंगोली – हिंगोली-सेनगाव राज्य महामार्गावर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थिनी(students) गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात हिंगोलीच्या राहुली फाट्याजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, हिंगोली बसस्थानकावरून जांभरून गावाकडे जाण्यासाठी तीन १७ वर्षीय विद्यार्थिनी(students) एका ऑटो रिक्षामधून प्रवास करत होत्या. रिक्षा वेगाने चालवली जात असताना अचानक एका विद्यार्थिनीचा तोल जाऊन ती रस्त्यावर कोसळली. पाठोपाठ इतर दोन विद्यार्थिनीही खाली पडल्या. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या अपघातात ऑटो रिक्षा आणि त्याचा चालक मात्र सुरक्षित राहिला. या घटनाक्रमामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला असून, रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रिक्षा चालकाने स्वतः जखमी मुलींना रुग्णालयात दाखल केले आहे. तथापि, अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
या घटनेने हिंगोली शहरात हळहळ व्यक्त होत असून, प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करत असून, लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, ‘या’ खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका
विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral
श्वानासोबत क्रूरता! पाय पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले…Video Viral