भाजपच्या सभेला ३०० रुपये देऊन रोजंदारीने माणसं? रोहित पवारांनी शेअर केला VIDEO

भाजपच्या सभेला पैसे देऊन रोजंदारीने माणसं बोलावली (video)जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला आहे. सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप, अशी टीका देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा, आता एकच मिशन.. ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी, असं म्हणत रोहित पवार यांनी हा व्हिडीओ(video) पोस्ट केला आहे.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच भाजपकडून सभांना गर्दी जमवण्यासाठी नागरिकांना विविध प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.

याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या सभेला पैसे देऊन रोजंदारीने पैसे आणले जात आहेत, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओत काही महिला दिसून येत आहेत.

भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेसाठी आपण आलो आहोत, यासाठी आपल्याला प्रतिव्यक्ती ३०० रुपये भेटले, असं या महिला व्हिडीओत सांगत आहेत. मात्र, संबधित व्यक्तीने ७०० रुपये घेऊन तुम्हाला फक्त ३०० रुपयेच दिले, असं एकजण या महिलांना सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

अजित पवारांना मोठा दिलासा; कचाकच बटण दाबा वक्तव्यावरून क्लीनचिट

समांथाच्या फॅशनचा थाटच न्यारा, हटक्या पद्धतीने कॅरी केला वेडिंग गाऊन

पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात, हायव्होल्टेज सभेकडे सर्वांचे लक्ष