गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री, सरकारची सर्वात मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर करत आहेत. हे मोदी सरकारचे ११ वे बजेट आहे. या अर्थसंकल्पात विशेषतः टॅक्स स्लॅबमध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन कर प्रणाली निवडणाऱ्या करदात्यांना सूट मर्यादा आणि टॅक्स स्लॅबमध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा आहे. १५ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी नवीन टॅक्स स्लॅब आणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थमंत्री(budget) निर्मला सीतारामन म्हणाल्या, “कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी ३६ जीवनरक्षक औषधांना मूळ सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिलेल्या औषधांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.” यामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती कमी होण्यास मदत होईल.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, “विमा क्षेत्रासाठी FDI मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के केली जाईल. ही वाढीव मर्यादा अशा कंपन्यांसाठी उपलब्ध असेल ज्या भारतातील संपूर्ण प्रीमियम गुंतवणूक करतात.” यामुळे विमा क्षेत्रात अधिक गुंतवणूक येण्यास मदत होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “सर्व MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि उलाढालीची मर्यादा अनुक्रमे २.५ आणि २ पटीने वाढवली जाईल. यामुळे त्यांना वाढण्यास आणि आपल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा विश्वास मिळेल.” MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
हेही वाचा :
अर्थसंकल्पात सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा
मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
अर्थसंकल्पात इंडिया पोस्टबाबत सरकारचा मोठा निर्णय