राहुल गांधींना शेअर बाजारातून 47 लाखांचा नफा; हिंदेनबर्ग अहवालावरून सरकारवर हल्लाबोल
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेअर बाजारात (stock market) केलेल्या गुंतवणुकीतून 47 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या पाच महिन्यांत राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये 46.49 लाख रुपयांचा नफा झाला असून, मार्चमध्ये त्यांच्या गुंतवणुकीचा एकूण मूल्य 4.33 कोटी रुपये असताना, तो आता 4.80 कोटी रुपये झाला आहे.
राहुल गांधी यांनी मार्च 2024 मध्ये रायबरेली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या पोर्टफोलिओच्या मूल्याची माहिती दिली होती. त्यांच्या गुंतवणुकीत एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅब्स, जीएमएम फोडलर, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस, टायटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स आणि एलटीआय माइंडट्री यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी व्हर्टोस ॲडव्हर्टायझिंग आणि विनाइल केमिकल्ससारख्या लहान कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.
त्यांनी पाच महिन्यांत काही कंपन्यांमधील शेअर्सची संख्या वाढवली आहे, तर काही कंपन्यांमध्ये त्यांना तोटा झाला आहे. एलटीआय माइंडट्री, टायटन, टीसीएस आणि नेस्ले इंडिया या चार कंपन्यांमध्ये त्यांना तोटा झाला आहे.
राहुल गांधी यांनी शेअर बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिंदेनबर्ग अहवालावरून सरकार आणि सेबीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सेबीच्या अध्यक्षांवरील आरोपांचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला आहे, आणि गुंतवणूकदारांच्या पैसे बुडाल्याबद्दल कोण जबाबदार आहे, हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीचे अध्यक्ष किंवा गौतम अदानी यांपैकी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा :
जेवताना एका बाजूने घास चावण्याची सवय धोकादायक; तज्ज्ञांचा नवा इशारा