“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(political news) यांनी काल (29 सप्टेंबर) नागपूर येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी तिखट सवाल केले.
“गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला फक्त 1500 रुपये असं महिला सांगतायेत. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करत होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पुढे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील भाष्य केलं.
“लोकसभा जिंकली आता विधानसभा(political news) जिंकायची आहे. परंपरेनं दसरा मेळावा घेणार, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार आहे. बऱ्याच वर्षांनी इथे आलोय. मीडियाला काम करु द्या, त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. आपल्या दैवताच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी मला बोलवलं, त्यासाठी आपले धन्यवाद”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे त्यांनी सिनेट निवडणुकीवरुनही टोलेबाजी केली. “दोन वर्षे सिनेटची निवडणुक पुढे ढकलली. ईव्हीएम नव्हतं म्हणून सीनेटच्या निवडणुकीत अभाविपला कमी मतं मिळाली.”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने दणदणीत विजय मिळविला आहे. यातून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मालवण येथील शिवरायांच्या पूतळ्यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ” मालवनमघ्ये झालं ते लाजीरवानं होतं. निवडणूक जिंकायची होती. शिवरायाच्या पुतळ्याचे पैसे खाल्ले. समितीचा रिपोर्ट आलाय. आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणाले वाऱ्याने पुतळा पडला. वाऱ्याने तुमची दाढी नाही हालत.”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हेही वाचा :
आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?
अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा