‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असून अद्यापही राज्यात पाऊस(rain) हजेरी लावत आहे. कारण हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणात देखील पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू पेरणीला विलंब होत असल्याचं दिसून येत आहे.

मात्र देशाच्या पूर्व किनारपट्टीला ‘दाना’ चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाच्या(rain) सरी कोसळणार आहेत. अशातच हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दल या दाना चक्रीवादळावर सातत्याने लक्ष देखील ठेवून आहे. यामुळे आता चक्रीवादळामुळे तब्बल 56 पथके तैनात करण्यात आली आहे. मात्र या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे.

कोकणातील रत्नागिरी,पालघर, रायगड, ठाणे या क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींकोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवायराज्यातील अनेक भागांमध्ये शेतांमधील पिकं सध्या कापणीसाठी आले आहे. मात्र त्यादरम्यानच पाऊस हजेरी लावत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय राज्यात पुढील 24 तासांमध्ये हवामानात फारसा बदल होणार नसून चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. मात्र आता पावसाच्या या हलक्या सरी कमी झाल्यानंतर राज्यात गुलाबी थंडी प्रवेश करणार आहे. अशातच सातारा, सांगलीसह विदर्भात देखील पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गुलाबी थंडीची चादर अंथरली जाणार आहे.

याशिवाय आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेनं पुढे येणारं ‘दाना’ चक्रीवादळ आता लँडफॉलसमयी आणखी तीव्र होणार होणार आहे. त्यामुळे आता त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच यावेळी वाऱ्याचा वेग ताशी हा 100 ते 120 किमी इतका असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळू असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

इथं परफेक्शनीस्ट, तिथं साऊथ सुपरस्टार; ‘गजनी 2’ मध्ये कोण बाजी मारणार? 

सांगलीत सत्तेनं माजलेला नेता निर्माण झाला…; रोहित पटलांचा संजयकाकांवर कडक प्रहार