शिंदे गटाचे 8 आमदार, एक मंत्री ठाकरेंकडे परत येणार?

विधानसभा(mla example) निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कारण आता मतदान अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि 8 आमदार परत शिवसेना ठाकरे गटात य्येवर असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे.

याशिवाय विधानसभा(mla example) निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरले जात असताना एकनाथ शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा मला फोन आला होता. यावेळी ते म्हणाले की, माझ्यासह 8 आमदार असून आम्ही मोठा बंड करत आहोत. त्यामुळे आता आम्ही उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून पक्षात परत येतो असं त्या मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मात्र यावेळी आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी त्यांना सांगितल आहे. याशिवाय 2019 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने 5 प्रमुख चेहरे आयात केले असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर देखिळ जोरदार टीका केली आहे. अनेक जण पक्ष बदलतात, तसेच विचारधारा देखील बदलतात, पण यांनी पक्ष फोडला, पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील चोरल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा :

ऑफिस लंच टाइममध्ये करा रोमान्स, मूल झाल्यास सरकार देणार लाखोंचं बक्षीस

नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

“आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते…”; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा