NEET घोटाळा: बिहारी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे जप्त, परीक्षा केंद्र निवडीवर प्रश्नचिन्ह
लातूर NEET घोटाळ्याचे बिहार कनेक्शन, 14 संशयितांची चौकशी सुरू
लातूर पोलिसांनी NEET परीक्षा (exam)घोटाळ्याच्या तपासात जप्त केलेल्या 14 अॅडमिट कार्डपैकी काही बिहारमधील विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात लातूर पोलिसांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधला असून, अधिक तपासासाठी संबंधित माहिती त्यांना पुरवली आहे.
परीक्षा केंद्र निवडीतील गैरव्यवहार उघडकीस
या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तपासादरम्यान, महाराष्ट्रातील विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षण घेत असले तरी, NEET परीक्षा काही विशिष्ट केंद्रांवर देण्यासाठी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पेपरफुटी, गुणवाढीचे आरोप
NEET परीक्षेपूर्वी पेपर फोडून तो संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच परीक्षेनंतर गुण वाढवून देण्याचे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत. या घोटाळ्याची पाळेमुळे लातूरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून, वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याच्या आमिषाने पालकांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचे उघड झाले आहे.
आरोपी शिक्षकांकडून धक्कादायक खुलासे
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी शिक्षकांनी या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक एजंट कार्यरत असल्याची कबुली दिली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याशिवाय, इतर सरकारी नोकरी भरती परीक्षांमध्येही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यातील एक आरोपी उत्तराखंडमध्ये लपून बसल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे त्याला अटक झाल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे.
हेही वाचा :
मनोज जरेंगा चांगली चाल: ‘अक्खा मराठवाडा’ अभियानाची घोषणा”
इचलकरंजी नगरीमध्ये सुप्रसिद्ध येवला पैठणीचे भव्य प्रदर्शन
हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये पुन्हा रक्तबंबाळ झाली प्रियांका