हिटमॅनचा नादच खुळा… अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या ‘या’ क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

इंग्लंडविरुद्ध झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये रोहितची बॅट(rohit sharma) चांगलीच तळपली. त्याने सलामीला येत ५७ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्डस मोडून काढले आहेत. भारतीय संघाचा डाव अडचणीत असताना रोहितने महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७१ धावांवर पोहोचवली. यादरम्यान त्याने विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अजहरुद्दिन आणि सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

रोहित शर्माने(rohit sharma) या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ५७ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने भारतीय कर्णधार म्हणून ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा कारनामा करणारा तो पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय कर्णधार म्हणून १२२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५०१३ धावा केल्या आहेत.

यापूर्वी हा रेकॉर्ड सौरव गांगुली, विराट कोहली, एमएस धोनी आणि मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या नावावर होता. या फलंदाजांनी कर्णधार म्हणून ५००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने २१३ सामन्यांमध्ये १२८८३ धावा केल्या आहेत. तर एमएस धोनीने कर्णधार म्हणून ११२०७ धावा केल्या आहेत. तर सौरव गांगुलीने १९५ सामन्यांमध्ये ७६४३ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद अजहरुद्दिनने ८०९५ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावा (टीम इंडियाचे धुरंधर कर्णधार)
विराट कोहली : 213 सामने, 12883 धावा
एमएस धोनी : 332 सामने, 11207 धावा
एम. अझरुद्दीन : 221 सामने, 8095 धावा
सौरव गांगुली : 195 सामने, 7643 धावा
रोहित शर्मा : 122 सामने, 5032* धावा

कशी होती दोन्ही संघांची प्लेईंग 11?
टीम इंडियाची प्लेईंग 11
: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेईंग 11 : फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपली.

हेही वाचा :

मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार, Hyundai INSTER EV लॉन्च

Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका

राजकीय भूकंप! अजितदादा गटाचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात…