गुटख्यासाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, तिघांना अटक

मुंबईतील(mumbai) मुलुंड पश्चिम येथे गुटख्यासाठी एका 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत गार्डन परिसरातील एका धबधब्याजवळ ही घटना घडली. पीडित तरुणाने गुटखा देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर सुऱ्याने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

गुटखाबंदी असूनही काळ्या बाजारात सर्रास विक्री

महाराष्ट्रात गुटखाबंदी असूनही काळ्या बाजारात त्याची सर्रास(mumbai) विक्री होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम येथे खुनाची ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन ताज हुसैन खान असे मृत तरूणाचे नाव असून तो अवघ्या 17 वर्षांचा होता. वसंत गार्डन परिसरातील एका धबधब्याजवळ ही हत्या घडली. पीडित मुलगा त्याच्या 16 वर्षीय मित्रांसह परिसरात गेला तेव्हा तिघांचंया टोळकं त्यांच्याकडे आलं. पीडित तरूणाकडे त्यांनी गुटख्याची मागणी केली.

मात्र त्याने तो देण्यास नकार दिल्याने त्या मुलाशी तिघे जण वाद घालू लागले. भांडणादरम्यान, संतापाच्या भरात एका तरूणाने सुरा काढला आणि पीडित तरूणावर सपासप वारल केला. त्याची छाती, हाता-पायांवर वार करून ते तिघेही तेथून फरार झाले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित मुलाला उपचारांसाठी तातडीने अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेणयात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी एकूण ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .

हेही वाचा :

सोशल मीडिया दिन : डिजिटल युगात कमाईचे नवे मार्ग

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

मनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू, येत्या 10 दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार