टीम इंडियाच्या विजायानंतर हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल?

भारताच्या ऐतिहासिक टी-20 विश्वचषक विजयानंतर खेळाडूंच्या आनंदोत्सवाचे क्षण सोशल मीडियावर(team) व्हायरल होत आहेत. यात हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ कॉल करतानाचा फोटो चर्चेत आला आहे. पांड्याच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ कॉल त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिच्याशी असल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही

अलीकडच्या काळात हार्दिक आणि नताशाच्या(team) नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. नताशाच्या काही सोशल मीडिया पोस्ट आणि आयपीएल दरम्यान तिची अनुपस्थिती यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र, व्हायरल झालेल्या फोटोमुळे दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे पांड्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

सामन्यात टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या स्वकियांना फोन कॉल, व्हिडीओ कॉल करून आपला आनंद साजरा करत होते. याच काळात हार्दिक पंड्यालाही एक व्हिडीओ कॉल आला. या व्हिडीओ कॉलमध्ये तो कोणाशीतरी बोलत असल्याचे दिसतेय. खाली मैदानावर बसून तो हा संवाद करतोय.

या व्हिडीओ कॉलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंचा आधार घेत नताशा आणि पांड्या यांच्यात व्हिडीओ कॉल चालू होता, असा दावा केला जातोय. खरं म्हणजे हार्दिक नेमकं कोणाशी बोलत होता, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण या निमित्ताने दोघांच्या नात्यात कसलीही नाराजी नाही, असे म्हणत पांड्याच्या चाहत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे, विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयानंतर त्याने पत्नी अनुष्का शर्माला केलेल्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या आनंदोत्सवाचे क्षणही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हेही वाचा :

कायम दुर्लक्षित; एसटी’ची झोळी या अर्थसंकल्पातही रिकामीच

गुटख्यासाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, तिघांना अटक

सोशल मीडिया दिन : डिजिटल युगात कमाईचे नवे मार्ग