जसप्रीत, विराट आणि अर्शदीपचे मैदानात भागंडा स्टाइल डान्सने सेलीब्रेशन

काल झालेल्या टी २० अंतिम सामन्यात भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना(dance) रंगला होता. काल दिवसभर क्रिकेटप्रेमींनी मॅच सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहिली. भारताने पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पटापट विकेट पडल्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये थोडी धाकधूक होतीच. पण काही वेळातच इंडिया टीमने जोरदार कमबॅक केले आणि टीमने १४० करोड भारतीयांची गर्वाने मान उंचावली.

विराट कोहलीने ५९ बॉलमध्ये ७६ धावा करत अर्धशतक पूर्ण केले तर अर्शदीपने चार ओव्हरमध्ये फक्त २० धावा देत दोन विकेट घेण्याची कसब दाखवली. भारतातील प्रत्येक चौकात काल दिवाळीसारख्या फटाके फुटले आणि तिथे बारबाडोसच्या मैदानात भारतीय टीमने भन्नाट डान्स(dance) करत सेलीब्रेशन केले.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताच्या वर्ल्डकप विजयाचा जल्लोष अर्शदीप सिंग आणि विराट कोहलीने भांगडा करत साजरा केला आहे. दोघांनी दिलेर मेहंदीचं प्रसिद्ध गाणं ‘तुनक तुनक तुन’ वर भन्नाट डान्स केला आहे. या दोघांना अक्षर पटेल, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराजची जोड मिळाली. हे सर्व खेळाडू भन्नाट डान्स करताना दिसून आले.

भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली याचा आनंद आहेच. मात्र कोट्यावधी क्रिकेट फॅन्सला निराश करणारी बाब म्हणजे विराट कोहलीने टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो यापुढे भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. २०२६ मध्ये पुढील टी -२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून विराटने हा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/i/status/1807139156352708992

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या विराटने आपली सर्वोत्तम खेळी फायनल सामन्यासाठी राखून ठेवली होती. त्याने ५९ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली. यासह तो या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दरम्यान या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

कायम दुर्लक्षित; एसटी’ची झोळी या अर्थसंकल्पातही रिकामीच

टीम इंडियाच्या विजायानंतर हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल?

3 जुलैला धडकणार दमदार आयपीओ; मालामाल होण्याची जबरदस्त संधी