वादळामुळे अडकली टी20 विजेती टीम इंडिया, मायदेशी परतण्यास विलंब

टी20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाच्या मायदेशी(home) परतण्याच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. बारबाडोस येथे आलेल्या बेरिल वादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. वादळाचा धोका लक्षात घेऊन बारबाडोस विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आल्याने टीम इंडियाला भारतात परतण्यास विलंब होणार आहे.

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला(home) बारबाडोसहून न्यूयॉर्कला जायचे होते आणि तेथून भारतात परतण्याची योजना होती. मात्र, बेरिल वादळामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वादळ शांत झाल्यानंतर आणि विमानतळ सुरू झाल्यानंतरच टीम इंडिया भारतात परतू शकेल, अशी अपेक्षा आहे. सध्या तरी 3 जुलै रोजी टीम इंडियाच्या भारतात येण्याची शक्यता आहे.

भारतात करोडो क्रिकेटप्रेमी आपल्या विजेत्या टीमच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्याची तयारी देशभरात सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला.

या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडियाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करत त्यांच्या संघभावनेचे आणि जिद्दीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा :

टी-20 निवृत्तीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पेन्शन ?

“अर्जुनाचे लक्ष्य: माशाचा डोळा होते, तसे आमचे लक्ष्य: विधानसभा”

गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट