लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत डाव साधला

विवाह सोहळा सुरू असताना अचानकपणे लाईट (unknown)गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत एका महिलेजवळ असलेली साडे सहा लाखांच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबार शहरामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,(unknown) नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नसमारंभ सुरू असतानाच अचानकपणे हॉलमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी स्टेजवर काही काळ अंधार पसरला होता. याचाच फायदा घेत सोन्या-चांदीची दागिने असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने उचलून नेली.

या बॅगेमध्ये दोन लाख 25 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, तीन लाख 50 हजार रुपये किमतीची पोत आणि 50 हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट असा (unknown)एकूण सहा लाख 55 हजार रुपयांचा ऐवज होता. या घटनेने नंदुरबार शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात छोट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

“नीट परीक्षा श्रीमंतांसाठीच”: राहुल गांधींचा आरोप, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटल्याचा दावा

जुलैमध्ये राज्यात सामान्यपेक्षा अधिक पाऊसाची आशा; हवामान विभागाची अंदाज

5 मिनिटात तयार होणारी मस्त घावणे आणि चटणी: मुलांचा पसंतीत नवा स्वाद