सरकारी नोकरीची सुवर्णसंधी….
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची(job search) सुवर्णसंधी आहे. नाबार्डमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत १५० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.
नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) या पदासाठी(job search) भरती करण्यात येणार आहे. यात कम्प्युटर/आयटी, फायनान्स, कंपनी सेक्रेटरी, सिव्हिल इंजिनिअर, जियो इन्फोर्मेशन, फोरेस्टरी, फूड प्रोसेसिंग, स्टॅटेस्टिक,मास कम्युनिकेशन/मिडिया स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
-कॉम्प्युर/ आयटी पोस्टसाठी उमेदवाराने ६० टक्के गुणांसह कॉम्प्युचर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी असणे गरजेचे आहे.
-फायनान्स पदासाठी ६० टक्के गुणांसह फायनान्स, बँकिंग विषया पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराने फायनान्स विषयात MBA/MMS केले असणे आवश्यक आहे.
-कंपनी सेक्रेटरी पोस्टसाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत CS पूर्ण केले असावे.
-सिव्हिल इंजिनियरसाठी सिव्हिल विषयात पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. ६० टक्के गुणांसह उमेदवार पास असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल विषयात इंजिनियरिंग केले असावे.
-या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे.नाबार्डने यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. लवकरच या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणेची शक्यता
साध्या पोह्यांपेक्षा इंदोरी पोहे कसे वेगळे? जाणून घ्या चटपटीत पोह्यांची सोप्पी रेसिपी