अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक: गेल्या दोन वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस(political party)पक्षाची मोट धरलेले सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. आपल्या शेकडो समर्थकांसह नाना महाले यांनी बारामती येथील गोविंदबागेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तुतारी वाजवली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर नवीन नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवारांनी भाजपा शिवसेना(political party) महायुतीत सहभागी झाले होते. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून नाशिकचे कार्यकर्ते स्वगृही परतले आहेत.

शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी म्हटले आहे की, “नाशिकमधील अनेक पदाधिकार्‍यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाना महाले, सिडको विभागाचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी प्रवेश केला आहे. अजित पवार आणि भुजबळ यांची भाजपने ससेहोलपेट केली आहे. शरद पवारांचे नेतृत्व आम्ही नाशिकमध्ये सिद्ध केले आहे. भाजप वापरतो आणि सोडून देतो, हे लक्षात आल्याने हे लोकं शरद पवारांच्या पक्षात येत आहेत. विधानसभेला आम्ही आमचा आमदार करू.”

नवीन नाशिकचे शेकडो पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यात माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

वृषभ राशीत होणार मंगळ ग्रहाचं संक्रमण! ‘या’ 5 राशींचं रातोरात बदलणार नशीब

मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी

सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य