कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू; मुलांच्या विरहाने माऊलीनेही सोडले प्राण
कोल्हापूर: कोपर्डे गावातील स्वप्नील कृष्णा पाटील आणि सुहास कृष्णा पाटील हे सख्खे भाऊ शिवारात(electric) काम करत असताना 3 जुलै रोजी विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे मृत्यूमुखी पडले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोटच्या दोन्ही मुलांच्या मृत्यूने धक्का(electric) बसलेल्या त्यांच्या आई, नंदाताई कृष्णा पाटील यांना पाच दिवसांपासून तोंडात पाण्याचा थेंबही न घेतल्यामुळे काल अखेरचा श्वास घेतला. पाटील कुटुंबाच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे..
स्वप्नील आणि सुहास, दोघेही तरुण वयात होते आणि त्यांच्या कमाईने घर सांभाळत होते. शेतात काम करत असताना विद्युत खांबाला चुकून स्पर्श झाल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघेही गतप्राण झाले होते.
पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई नंदाताई कृष्णा पाटील या दु:खातून सावरण्यात अपयशी ठरल्या आणि शेवटी काल निधन पावल्या. कोपर्डे गावातील या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
पठ्ठ्याने झाडावर बसून शूट केलेला व्हिडिओ व्हायरल; ओपन बसमधून कोहली-जडेजाने दिली भन्नाट रिअॅक्शन
जयंत पाटलांचा ‘हा’ पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा