विशाल पाटलांना मंत्र्यानं दिली थेट भाजपात येण्याची ऑफर, अन् मग…

सांगलीतील किर्लोस्करवाडी येथे हुबळी एक्स्प्रेसच्या थांब्याच्या उद्घाटनप्रसंगी(political news) पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशाल पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दर्शविला होता.

झालं असं की गेल्या पंधरा वर्षांपासून(political news) मध्य रेल्वे प्रवासी संघटनेची हुबळी एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची मागणी होती. या मागणीची अखेर रविवारी पूर्तता झाली. हुबळी एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी येथे थांबली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या गाडीला झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. या कार्यक्रमात पालकमंत्री खाडे यांनी विशाल पाटील यांना भाजपात येण्याची जाहीर ऑफर दिली.

“खासदार विशाल तुम्ही म्हणता की, सर्वांनी मला निवडून दिलं आहे. तर, मग आमच्यासोबत यायचं सोडून चुकीच्या ठिकाणी का गेला? अजूनदेखील तुमचे आमच्या सरकारमध्ये स्वागत आहे. एकत्र येऊन कमागे मार्गी लावू,” असं पालकमंत्री खाडे यांनी म्हटलं.

यावर विशाल पाटलांनी विचारधारा सोडणार नसल्याचं सांगून ऑफर धुडकावून लावली. “मी माझी विचारधारा सोडणार नाही. तुम्ही मला प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करा,” असं विशाल पाटलांनी म्हटलं.

“किर्लोस्करवाडीला रेल्वेचा थांबा मिळाल्यानं परिसरातील प्रवाशांची मुंबईला जाण्याची सोय झाली. कोल्हापूरहून मिरजपर्यंत येणारी पॅसेंजर गाडीदेखील आपण किर्लोस्करवाडीला आणण्याचा प्रयत्न करू,” असं आश्वासन पालकमंत्री खाडे यांनी दिलं.

“लवकरच मिरज येथे रेल्वेचे अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रवासी संघटना, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावू,” असं विशाल पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा :

सिंधुदुर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट

क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी…

ऑलिम्पिकसाठी सिंधू ध्वजवाहक ;नेमबाज गगन नारंगची पथकप्रमुख निवड