भारतीय क्रिकेट विश्वातून एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीर संघाने प्रथमच विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. (Jammu and Kashmir) या यशामुळे संपूर्ण क्रिकेट वर्तुळात जम्मू-काश्मीर संघाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडिया आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 मध्ये कठीण टप्प्यावर उभी आहे. सुपर 8 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताचा सामना वेस्ट इंडिज संघाशी 1 मार्च रोजी होणार आहे. या सामन्याचा निकाल थेट उपांत्य फेरीचं तिकीट ठरवणार असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. (Jammu and Kashmir) त्यामुळे भारतीय चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अशा पार्श्वभूमीवर देशांतर्गत क्रिकेटमधून आलेली ही बातमी अधिकच लक्ष वेधून घेत आहे. जम्मू-काश्मीरच्या या ऐतिहासिक यशामागे संघातील खेळाडूंनी दाखवलेली शिस्तबद्ध कामगिरी आणि संघभावना महत्त्वाची ठरली.(Jammu and Kashmir) विशेष म्हणजे या संघात रोहित शर्मा नावाचा खेळाडू असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. मात्र हा रोहित शर्मा म्हणजे टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज किंवा माजी कर्णधार नसून, हा जम्मू-काश्मीरचा गुणवान गोलंदाज रोहित शर्मा आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी तो जम्मू-काश्मीरच्या मुख्य संघाचा भाग होता आणि संघाच्या यशात त्याचाही मोलाचा वाटा राहिला.

या विजेतेपदामुळे जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी एक नवा अध्याय सुरू झाला असून, भविष्यात येथील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर अधिक ठसा उमटवतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *