‘कोण कुठून पळून जाईल हे कळेल’, विधानपरिषदेच्या निकालाआधी : संजय राऊत
राज्याच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या(council) ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. विधानपरिषदेच्या मतदानासाठी आमदारांसोबत विधानभवनात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“लोकसभा निवडणुकीच्या(council) निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेल आहे. आज लागणार निकाल हा उद्याच्या चार महिन्यात लागणाऱ्या निकाल ठरवणार आहे. आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून जाते हे तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
“मला अजित पवार, शेकापचे जयंत पाटील भेटले, चंद्रकांत पाटील भेटले. महाराष्ट्राच्या राजकारणात घाण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. तोच अधिकार गणपत गायकवाड यांना दिला. याबाबत निवडणूक आयोगात जे गेले आहेत ते योग्य आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
“आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो मोदींना भेटतो ते आमचे हात धरतात आम्ही अनेक वर्ष काम केलेला आहे एकत्र त्यांचा आमचा वैयक्तिक भांडण आहे का? आम्हाला बघून प्रत्येकाला मागेच फिरावे लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मागच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी येथून पळ काढला होता. आमचे तिन्ही उमेदवार हे व्यवस्थित निवडून येतील. कोण पडेल हे मी सांगू शकत नाही, “असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
हेही वाचा :
अवघ्या ५ सेंकदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं video
बीसीसीआयचं ठरलं… पाकिस्तानमध्ये भारतीय संघ जाणार की नाही, जाणून घ्या मोठा निर्णय
हनी सिंगच्या आयुष्यात नवी ‘मलायका’? चर्चांनी रंगला बॉलिवूड