‘विराट पाकिस्तानमध्ये आला तर…’, आफ्रिदी स्पष्टच बोलला
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे(virat). पाकिस्तानकडे यजमानपद असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून या स्पर्धेसाठी दुबई किंवा श्रीलंकेच्या नाव सुचवले जाणार आहे. भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी बीसीसीआय फारशी उत्सुक नाही, त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने बीसीसीआयला(virat) असा विचार न करत उलट विचार करावा असा सल्ला दिला आहे. आफ्रिदीने म्हटले आहे की भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला पाहिजे. त्याच्या मते, यामुळे केवळ दोन्ही देशांमधील क्रिकेटसंदर्भातील संबंध अधिक दृढ होतील, परंतु पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीला प्रत्यक्षात मैदानात खेळताना पाहता येईल.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या द्विपक्षीय मालिका 2013 पासून थांबवण्यात आल्या आहेत. भारतीय संघाने 2006 साली पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. मागील वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ भारतात आला होता. त्यामुळेच भारतीय संघ आता पाकिस्तानात जाऊन या दौऱ्याची परतफेड करेल अशी अपेक्षा होती.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानेही भारतीय संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केवळ लाहोरमध्येच सामने खेळवण्याचे नियोजन केले होते. भारत-पाकिस्तान बॉर्डरपासून हे शहर जवळच असल्याने इथे सामने खेळवण्याचे पाकिस्तानचे नियोजन होते. मात्र एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय संघाला पाकिस्तान पाठवण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी मागील वर्षी खेळवलेल्या आशिया चषक स्पर्धप्रमाणे हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआय आयसीसीला देऊ शकते.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता केवळ एकदिवसीय सामने आणि कसोटी खेळणार आहे. त्यामुळे विराट कोहलीला पाकिस्तानात खेळताना पाहण्यासाठी पाकिस्तानी चाहतेही फार उत्सुक आहेत.
शाहीद आफ्रिदीने भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याला पाठिंबा देताना म्हटले, “मी भारतीय संघाचे पाकिस्तानमध्ये स्वागत करेन. पाकिस्तानचा संघ भारतात गेला होता तेव्हा त्यांना फार प्रेम आणि सन्मान मिळाला होता. तसेच 2005-2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानात आला होता तेव्हा सर्वच भारतीय खेळाडूंनी त्या दौऱ्याचा आनंद घेतला होता. भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी जातात याहून मोठा शांततेचा संदेश दुसरा कोणताही नाही.”
आफ्रिदीने असेही म्हटले, “विराट कोहली पाकिस्तानमध्ये आला तर भारतात त्याला मिळणारे प्रेम आणि आदरातीथ्य तो विसरून जाईल. तो वेगळ्याच दर्जाचा खेळाडू आहे.” पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने आपल्या विधानामधून विराट कोहलीची लोकप्रियता ही सीमेच्या पलीकडेही प्रचंड असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा :
बजाजनंतर आता टीव्हीएसही लाँच करणार सीएनजी बाईक
मोठी बातमी! पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?
अजित पवार तडकाफडकी दिल्लीला, काहीतरी मोठं घडणार; आमदारांची धाकधूक वाढली