सिटी बसने चौघांना चिरडलं; चिमुकल्याचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात अपघात सत्र काही थांबत नाहीयेत. मुंबई, पुणे यासह अनेक ठिकाणी भयंकर (city)अपघात झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अशात अमरावतीत एक भयंकर अपघात घडला आहे.
शहरातील प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भरधाव सीटीबसने (city)रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांना चिरडले. या भीषण अपघातामध्ये 9 वर्षाच्या चिमूकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अमरावतीमधील सायन्स कोर मैदानासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या बसची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम गोविंद निर्मळे (वय 9) या मुलाचा बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर, अजून तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत.
या तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांचा संताप पाहता सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (14 जुलै) सकाळी शिरसगाव कसब्यातील रहिवासी असलेल्या नर्मदा निर्मळे या त्यांचा नातू आणि दोन नातीनसोबत सायन्स कोर्सच्या बस डेपो परिसरातून रस्त्याने जात होत्या. यावेळी अमरावती शहरात असणाऱ्या भरधाव सीटीबसने या चौघांना जोरदार धाड दिली. यात प्रीतम (9 वर्षीय मुलगा) हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आजी व दोन नाती या जखमी झाल्या आहेत.
हेही वाचा :
…अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनचा खुलासा
टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?
दारूची नशा तरूणाच्या बेतली जीवावर, हॉटेलवर रंगली दारू पार्टी, नशेत टेरेसवर गेला अन्…