‘माझ्यासोबत विश्वासघात झाला’; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप!

लोकप्रिय अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे(marriage counseling) चर्चेत आहे. सोनाक्षी ही तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यात सोनाक्षी सिन्हानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर असलेल्या झहीर इक्बालच्या कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यानं म्हटलं की सोनाक्षीनं त्याला धोका दिला आहे. खरंतर, झहीरनं हे मस्करीत म्हटलं आहे. चला जाणून घेऊया नक्की काय झालं…

सोनाक्षी सिन्हानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात सोनाक्षी(marriage counseling) ही मेकअप करताना दिसत आहे आणि लग्नानंतर ती डेट नाइटसाठी कशी तयार होते हे दाखवते. व्हिडीओमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सोनाक्षीनं जशी ही पोस्ट शेअर केली त्यानंतर लगेच झहीरनं त्यावर मजेशीर कमेंट केली आहे.

झहीर इक्बाल यावेळी कमेंट करत म्हणाला, ‘माय लॉर्ड माझ्यासोबत धोका झाला आहे.’ त्यानंतर त्यानं एक कमेंट केली ज्यात लिहिलं की ‘यात काही आश्चर्य नाही, तू नेहमीच माझ्या आधी तयार होते. ही चीटिंग आहे.’ त्यासोबत त्यानं हसण्याचं इमोजी शेअर केलं आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या कमेंटवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सोनाक्षी सिन्हानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नासोबत तिच्या खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केलं आहे. तिनं म्हटलं की ‘झहीरशी लग्न करणं म्हणजे घरी परतण्यासारखं आहे. कारण आता तिला झहीरसोबत काही वेळ व्यथित करण्याची संधी मिळते. सोनाक्षीनं हे देखील सांगितलं की ते नेहमीच चांगले मित्र होते आणि त्यांचं लग्न लवकर झालं असतं तर किती बरं झालं असतं.’

दरम्यान, झहीर आणि सोनाक्षीनं 23 जून रोजी लग्न केलं आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्याआधी ते दोघं 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती कारण लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का याची चर्चा होती. मात्र, असं काही झालं नाही. त्या दोघांनी कोणत्याही धर्मानुसार लग्न न करता थेट रजिस्टर लग्न केलं.

हेही वाचा :

स्मृती मानधनाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? नॅशनल क्रशने सांगितली ‘दिल की बात’

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर: जाणून घ्या कोणत्या कारणांमुळे आल्या चर्चेत

डायबिटीज रुग्णांसाठी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला: मध आणि गूळ सेवनाने ब्लड शुगर होईल कमी?