विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा
लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात देखील भाजपला(Assembly) मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात आज भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात(Assembly) बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा. असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते. विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधक म्हणतात की सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर आम्ही विरोधकांना 2013 च्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. सध्याच्या किमतीपेक्षा त्या अधिक आहेत.
त्यामुळे या किमती दाखवल्यानंतर विरोधक शांत बसतात. सध्या मी आत्मचिंतन करत आहे. सर्वांना उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहत असतो. त्यामुळे आदेश आला तर उत्तर देऊ. नाहीतर उत्तर देणार नाही असे म्हणतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!
तो गेला, त्याला वाचवा, रस्ता क्रॉस करताना पाण्याच्या प्रवाहात मुलगा वाहून गेला Video
शिवसेना ठाकरे गट सांगलीत दोन जागा लढणार, चंद्रहार पाटलांनी दोन्ही मतदारसंघाची नावे सांगितली!