दादांच्या बालेकिल्ल्यात भाईंची फिल्डींग; शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग…

पुणे: लोकसभेला राज्यात अपयश आल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर(politics) कसली आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग एकमेकांच्या बालेकिल्ल्यात मित्रपक्षांकडून विस्तार केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीवर शिंदेसेनेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसह यवतमाळमधील अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चेहऱ्यांचा समावेश आहे.

पश्चिम बारामतीत येणाऱ्या मालिगाव सहकारी साखर कारखान्याचे(politics) संचालक सुरेश तुकाराम खलाटे आणि विलास देवकातेंनी शिंदेसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. याशिवाय शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रभाव असणाऱ्या अजित जगताप आणि अजित काशीनाथ जगताप यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशात शिंदेसेनेच्या गीतांजली धोणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख आहेत.

बारामतीत अजित पवारांचं चांगलं वर्चस्व आहे. पण शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांना बारामतीत मोठा फटका बसला. सत्तेत असलेल्या अजित पवारांना बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणता आलं नाही. शरद पवारांनी अचूक डाव टाकत सुप्रिया सुळेंना विजयी केलं. त्यामुळे बालेकिल्ल्यातच अजित पवारांना जोरदार झटका बसला.

आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीत अजित पवारांना दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार सातत्यानं बारामतीचे दौरे करत आहेत. त्यांच्या सोबत नातू युगेंद्र पवार असतात. त्यामुळे शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळू शकते. तसं झाल्यास काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळेल.

एका बाजूला शरद पवार बारामतीत अजित पवारांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. लोकसभेच्या निकालामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा बूस्टर मिळाला आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेनं बारामतीत विस्तार सुरु केला आहे. लोकसभेवेळी शिंदेसेनेच्या विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याची घोषणा करत अजित पवारांची चिंता वाढवली होती. त्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते. पण त्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन दूर झालं. पण आता शिंदेंनी बारामतीत पक्षाला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका अजित पवारांना भविष्यकाळात बसू शकतो.

हेही वाचा :

रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय?

हार्दिक पांड्या करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा!

महायुती सरकारचा नवा निर्णय: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोफत गॅस सिलेंडर