जीवघेणी धडपड बसमध्ये चढताना मुलगा चाकाखालीच गेला VIDEO VIRAL
नंदुरबार शहरात बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी (education)धडपड उडाली आहे. विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळवण्यासाठी बसच्या मागे धावताना एक विद्यार्थी बसच्या चाकाखाली गेला. हा विद्यार्थी एसटीच्या मागील चाकात अडकला, परंतु भाग्यवश त्याला वाचवण्यात आले.नंदुरबार शहरात शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे, परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रोज नंदुरबारला येतात. परंतु बसची कमतरता आणि जागेची अडचण यामुळे विद्यार्थ्यांना बस स्थानकावर मोठी गर्दी सहन करावी लागते. विशेषत
गावाकडे परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची कमी उपलब्धता असते, त्यामुळे त्यांना बसमध्ये जागा मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.ताज्या घटनेनुसार, बसमध्ये (education)जागा मिळवण्यासाठी एक विद्यार्थी बसच्या मागे धावत असताना त्याचा पाय बसच्या मागील चाकात अडकला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी वेळीच लक्ष देऊन त्याला बाहेर काढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला. विद्यार्थ्याला किरकोळ जखम झाली आहे.
या घटनेमुळे नंदुरबारमधील विद्यार्थ्यांसाठी बस प्रवासाच्या समस्येवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवा सुरू करणे अत्यावश्यक आहे. विशेष बस सोडल्यास विद्यार्थ्यांची धडपड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांच्या सुरक्षिततेला (education)सुनिश्चित करता येईल, असे अनेकांचे मत आहे.
हेही वाचा :
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले
देशात १.४० लाख नवउद्यमी नोंदणीकृत; उद्यमशीलतेला प्रोत्साहन
विधानसभेपूर्वी राजकीय वारे फिरले; अजित पवार गटाचा बडा मासा शरद पवारांच्या गळाला