ऑलम्पिक विलेज बनलं कंडोमचं मार्केट, वेलकम किटमध्ये खेळाडुंना मिळतेय ‘अशी’ सुविधा

पॅरिस ऑलिम्पिक(olympic) 2024 ला सुरुवात झाली आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु झाला असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताचे 117 खेळाडूंचे पथक या स्पर्धेत सहभागी झाले आहे. जगभरातील 10,000 हून अधिक खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक विलेजमध्ये थांबले आहेत, जिथे त्यांना राहण्याची, खाण्याची आणि वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली जात आहे.

खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वेलकम किटमध्ये कंडोम(olympic) आणि इंटिमसी संबंधित वस्तू असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार, खेळाडूंसाठी साधारण 2 लाख कंडोमची व्यवस्था करण्यात आली आहे आणि प्रत्येक खेळाडूला 14 कंडोम देण्यात येत आहेत. वेलकम किटमध्ये एक फोन आणि डेंटल डेम्सदेखील दिले जात आहेत.

खेळाडूंनी त्यांच्या वेलकम किटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऑलिम्पिकसाठी सजवलेल्या मंचावर सीन नदीमध्ये मार्चपास्ट पहिल्यांदाच होणार आहे, ज्यात 94 होड्या सहभागी होतील आणि ही परेड साधारण 6 किलोमीटरपर्यंत चालणार आहे.

भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पोहोचल्यावर तिथल्या खाण्याबाबत काही तक्रारी केल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अॅथलिट खाण्याच्या सुविधेपासून संतुष्ट नाहीत. भारताची डबल बॅडमिंटन स्टार तनिषा क्रेस्टोनने सांगितले की, “राजमा होता पण आम्ही पोहोचण्याआधीच तो संपला होता.” बॉक्सर अंतिम पघालने देखील तक्रार केली की तिने तिच्या सपोर्ट टीमला भारतीय खाण्याची ऑर्डर दिली होती.

भारताचे पथक 117 खेळाडूंचे आहे, ज्यात दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधु आणि 2020 टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा समावेश आहे. या दोघांकडून पुन्हा पदकांची आशा आहे. भारतीय पथकात महाराष्ट्रातील पाच खेळाडू आणि हरियाणातील सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा :

ऑलिंपिक:पहिल्याच दिवशी भारतीय उघडणार पदकाचं खातं? 

जीवघेणी धडपड बसमध्ये चढताना मुलगा चाकाखालीच गेला VIDEO VIRAL

चेहऱ्यावरून ओळखा स्त्रियांचा स्वभाव प्रेमात पडण्याआधी १० वेळा विचार करा