पुन्हा कोयता गँगची दहशत; दुकानासह वाहनांची तोडफोड, धक्कादायक VIDEO
पुणे शहरातील लोहगाव परिसरात शनिवारी रात्री कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत(VIDEO) माजवली. या गुंडांनी दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करत नागरिकांना धमकावलं. हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या या गुंडांनी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गुन्हा दाखल (VIDEO)केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडांना पकडून त्यांची धिंड काढली होती आणि तडीपाराच्या नोटीसाही धाडल्या होत्या. मात्र, हे गुंड पुन्हा सक्रिय झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अचानक कोयता गँगचे गुंड लोहगाव परिसरात आले. त्यांनी हातात कोयते घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि “आम्ही इथले भाई, आमच्या नादाला लागू नका,” असं म्हणत नागरिकांना धमकावलं. या घटनेत चेनाराम चौधरी यांच्या दुकानातही तोडफोड झाली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम तैनात केली आहे.
पुण्यातील नागरिकांनी या प्रकारामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
टोमॅटोच्या दरात वाढ! ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन
निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष, पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा लिफ्टमध्ये स्फोट; गंभीररित्या जळाला व्यक्ती…Video