मोबाईल गेमच्या टास्कने 10वीच्या विद्यार्थ्याचा बळी, 14व्या मजल्यावरुन उडी…

पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल गेमच्या (online games) व्यसनात अडकलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी मुलाच्या खोलीची तपासणी केली असता, गेममधील (online games) टास्क लिहिलेले कागदपत्रे आढळून आली आहेत. या कागदपत्रांवर घराचे स्केच आणि “गॅलरीतून जम्प कर” असा टास्क लिहिलेला होता.

मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून मुलगा गेमच्या (online games) आहारी गेला होता. तो तासनतास खोलीत एकटाच बडबड करत असे आणि वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. पालकांनी त्याला या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यात अडकत गेला.

या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की, ते आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवून त्यांना अशा व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावा. तसेच, सरकारने अशा धोकादायक गेमवर बंदी घालावी, अशी मागणीही मुलाच्या पालकांनी केली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर: औरवाड उपसरपंचपदी अफसर पटेल यांची बिनविरोध निवड, गावात उत्साह

नाना पटोले यांचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान: “दम असेल तर सिद्ध करा!”

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गोंधळ: चुकून मांसाहारी जेवण दिल्यामुळे प्रवाशाने कर्मचाऱ्याला मारली कानाखाली, पाहा Viral Video