राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर: लालपरीची चाके थांबणार?

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी(employees) पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संपाची हाक दिली आहे, ज्यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागण्या:
एसटी कर्मचाऱ्यांनी (employees)राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच, कामगार कराराच्या तरतुदीनुसार थकबाकी महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करणे, २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहिर केलेल्या ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रक्कम वाटप करणे, आणि सर्व कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट ५००० रुपयांची वाढ करणे यासह इतर प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत.

पार्श्वभूमी:
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये सलग ५४ दिवसांचे आंदोलन केले होते, ज्यामुळे राज्यातील दळणवळण ठप्प झाले होते. त्यावेळी काही मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु त्यांचे पूर्ण पालन झाले नसल्याचा आरोप करून आता पुन्हा संपाची हाक देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाची परिस्थिती:
एसटी महामंडळ सध्या मोठ्या आर्थिक तोट्यात आहे. करोनाकाळानंतर सन २०२०-२१ मध्ये तोटा सहा हजार कोटी रुपयांवर गेला होता, जो आता ९ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने, एसटी महामंडळ राज्य सरकारवर अवलंबून आहे.

ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार असल्यामुळे, त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यातील प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा :

भारतात व्हॉट्सअप बंद होणार? मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं..

एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून अमित शाहांना भेटायचे : संजय राऊत

उरण हत्याकांड प्रकरण: आरोपी दाऊद शेखला अटक; सीसीटीव्ही फुटेजही समोर