आयएएसमधून पूजा खेडकरांना डच्चू; यूपीएससीची कडक कारवाई,

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (IAS)यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) कडक कारवाई करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत यूपीएससीने त्यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली आहे. तसेच भविष्यातील परीक्षा आणि निवडींमध्ये त्यांना कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरी सेवा परीक्षा २०२२च्या माध्यमातून शिफारस करण्यात आलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी ओळख दडवून परीक्षा देण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयत्नांचे उल्लंघन केल्याबाबत यूपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना २५ जुलैपर्यंतचा कालावधी दिला होता, परंतु पूजा यांनी ४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. यूपीएससीने ३० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु पूजा यांनी दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण सादर केले नाही.

यूपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासून नागरी सेवा परीक्षा २०२२च्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या उमेदवारीची तात्पुरती रद्दबातल करण्यात आली आहे आणि यूपीएससीच्या भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून त्यांना कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आले आहे.

याप्रकरणामुळे यूपीएससीच्या कठोरतेचे आणि पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित होते, तसेच भविष्यातील उमेदवारांसाठी एक कडक संदेश दिला जातो.

हेही वाचा:

“अधिक जगण्याची इच्छा नाही” राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची उद्विग्न प्रतिक्रिया

पुष्पा २ चा लीक झालेला व्हिडीओ व्हायरल, चाहते चित्रपटाच्या निर्मात्यांवर संतप्त

लग्नाला नकार दिला म्हणून सपासप वार करून संपवलं; यशश्रीच्या हत्येमागे प्रेम