गोलंदाजी करताना दोनदा अडखळला…रोहित शर्मा थेट वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावला, Video

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा(Rohit Sharma) एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी(Rohit Sharma) करण्याच्या निर्णय घेतला होता. श्रीलंकेला 50 षटकांत 9 बाद 240 धावांवर रोखल्यानंतर भारताचा डाव 42.2 षटकांत 208 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 64 धावांची आक्रमक खेळी केल्यानंतरही भारताला पराभूत व्हावे लागले.

श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वेंडरसे याने 33 धावांत 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. याचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दिशेने मारायला धावत असल्याचे दिसून येत आहे.

सामन्यात गोलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदर चेंडू टाकण्यापूर्वी सलग दोन वेळा रनअप घेऊन चेंडू न टाकताच थांबला. गोलंदाजी करताना दोन दोनदा अडखळला. त्यामुळे स्लिपला उभा असलेला रोहित शर्मा चांगलाच वैतागला. यानंतर तो गमतीने वॉशिंग्टन सुंदरच्या दिशेने त्याला मारायला धावला. हे पाहून यष्टीरक्षक केएल राहुलसह वॉशिंग्टन सुंदरलाही हसू आले. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी सादर केली. वॉशिंग्टन सुंदरने 10 षटकांत केवळ 30 धावांत 3 फलंदाज बाद केले. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 240 धावा केल्या.

अशाप्रकारे भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य होते, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा डाव 42.2 षटकात 208 धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांना साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

https://twitter.com/i/status/1820062509178528048

रोहित शर्मा या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पराभूत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दु:खी करत असते. फक्त 10 ओव्हरची गोष्ट नसते, जेव्हा तुम्हाला मॅच जिंकायची असते तेव्हा सातत्य राखायला लागतं.आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरलो, थोडा निराश झालो आहे, मात्र असं होतं असतं, तुमच्या समोर जे आहे ते बदलायचं असतं.

आम्हाला वाटलं डाव्या उजव्या फलंदाजाची जोडी फायदेशीर ठरेल. मात्र वेंडरसेनं चांगली कामगिरी केली, त्यानं सहा विकेट घेतल्या, असं रोहित म्हणाला. आक्रमक फलंदाजी केल्यामुळं 64 धावा केल्या, मी माझं धोरण बदलणार नसल्याचं देखील तो म्हणाला. आम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे, मधल्या षटकात खेळणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित शर्माने सांगितले.

हेही वाचा:

अबब! कारच्या खिडकीला लटकून कार चालवत होता video

पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

व्यसनाधीन तरुणाचा आईवर बलात्कार, आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना