विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना ठाकरे गटाचा पाठिंबा; निवडणुकीची समीकरणे बदलणार

कागल: आगामी विधानसभा निवडणुकीच्या(election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना ठामपणे पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. साके (ता. कागल) येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना संजय घाटगे यांनी जनसामान्यांचा विकास साधण्यासाठी मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला.

संजय घाटगे म्हणाले, “आम्हाला जनसामान्यांचा विकास हवा आहे आणि तो हसन मुश्रीफ यांच्या रूपाने मिळण्याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.”

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे उपस्थित होते.

संजय घाटगे यांनी पुढे स्पष्ट केले की, “भाजपात मुश्रीफ असते तर ढुंकूनही पाहिले नसते. ते राष्ट्रवादीचे समतावादी नेते असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काहीही परिणाम झाले तरी बेहत्तर. आमची विचारधारा, दिशा बदलणार नाही.”

या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि अजितदादा गटाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

आदित्य ठाकरेंना उमेदवारीबाबत विचारले असता मनसे नेते टोला मारत म्हणाले, “मला वाटलं…”

महाराष्ट्रात श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या तारखा वेगवेगळ्या का असतात? जाणून घ्या कारण

सोसायटीतील ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात, पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल