बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय वस्त्रोद्योगाला संधी, निर्यात वाढण्याची शक्यता.

कोल्हापूर : बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा भारतीय वस्त्रोद्याोगाला (textile industry)होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषत तयार कपडे (गारमेंट) निर्यातीत बांगलादेशचे स्थान पाहता, ही मागणी भारताकडे वळण्याची शक्यता वस्त्रोद्योगातून व्यक्त केली जात आहे.

याचा परिणाम म्हणून देशातील प्रमुख वस्त्रोद्याोग निर्यातदार कंपन्यांच्या समभागांचे मूल्यही मंगळवारी वधारले.

पाच दशकांच्या प्रयत्नानंतर बांगलादेश वस्त्रोद्योगातील अग्रणी निर्यातदार देश झाला आहे. आता तेथील अस्थिर परिस्थितीचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावरही दिसू लागला आहे. बांगलादेश टेक्स्टाईल मिल असोसिएशनने त्यांचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामस्वरूप सध्या या देशाकडे अन्य देशांची असलेली तयार कपड्यांची मागणी रद्द होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भारताला यातून मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला; जगभरात कुस्तीपटूंना चकित करणारा विक्रम

अल्पवयीन मुलीचे हात-पाय, तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडले

बिग बॉसआधी जान्हवी किल्लेकरची कबुली, “मी खूप गुणी आहे!”