हॉटेलमधील जेवण महाग होण्याची (expensive)शक्यता सध्या वाढली असून त्यामागे अनेक कारणे समोर येत आहेत. देशातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर वाढत्या खर्चाचा मोठा परिणाम होत आहे.नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, विशेषतः नागपूरसारख्या शहरांमध्ये हॉटेल्सचा खर्च 20 ते 30 टक्क्यांनी वाढला आहे.

यामागे कमर्शियल LPG सिलिंडरचे (expensive)दर जवळपास दुप्पट होणे, तसेच पनीर, बटर, दही यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत 40% पर्यंत वाढ होणे ही प्रमुख कारणे आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्येही कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट्सच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अनेक हॉटेल्सना रोज 2-3 सिलिंडर लागतात, त्यामुळे थेट मेन्यूच्या दरात वाढ करण्याचा दबाव वाढला आहे.

सध्या बहुतांश रेस्टॉरंट्सवर 5% GST लागू आहे, पण मोठ्या हॉटेल्समध्ये जिथे (expensive)रूम टॅरिफ जास्त आहे) 18% GST लागू होतो, त्यामुळे तिथे जेवण आधीच महाग पडते. तरीही अनेक हॉटेल मालक सध्या ग्राहक टिकवण्यासाठी दर वाढ टाळत आहेत, पण खर्च वाढत राहिला तर लवकरच मेन्यू महाग होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. उद्योग क्षेत्रातूनही स्पष्ट संकेत मिळत आहेत की, जर गॅस आणि कच्चा माल महागच राहिला, तर पुढील काही आठवड्यांत सर्वसामान्यांना हॉटेलमधील जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *