लग्नाआधीच मृणाल ठाकूर आई! स्वत:च केला खुलासा
बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री या लग्नाच्या आधी आई झाल्या आणि त्यांनी जगसमोर(mother) हे आनंदानं मान्य केलं. असंच काहीसं अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या बाबतीत झालं आहे. मृणालनं 32 व्या वर्षी देखील लग्न केलेलं नाही तर ती एका मुलीची आई झाली आहे. हे ऐकून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य झालं असेल. पण हे सत्य आहे की ती एका 8 वर्षांच्या मुलीची आई झाली आहे. तिनं स्वत: हे स्वीकार केलंय आणि मान्य केलं की आता ती ज्या बाळाला जन्म देईल ते तिचं दुसरं बाळ असेल. मृणाल ठाकुरनं एका मुलाखती दरम्यान याविषयी सांगितलं होतं. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मृणाल ठाकुरचं नाव आजवर अनेक कलाकारांसोबत जोडण्यात(mother)आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की तिला विराट कोहलीसाठी भावना होत्या. पण तिनं त्या सगळ्या बातम्या या खोट्या असल्याचं तिनं म्हटलं. आता त्या सगळ्यात एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तिनं एका लहान मुलीला तिची मुलगी असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली की ती माझं पहिलं मुलं आहे.
ती माझं पहिलं मुल आहे, आता जेव्हा कधी मला मुलं होईल. ते दुसरं असेल. कारण ती माझं पहिलं मुलं आहे. कारण तुमच्यात तसं बॉन्ड हळूहळू तयार होऊ लागतं. ती मला यशना म्हणून हाक मारते किंवा Mmmmm बोलते. ती गुणी मुलगी आहे आणि फक्त डोळ्यांनी बोलते. तिच्याकडून शिकणं खूप सुंदर आहे. त्या मुलीला माहित नाही की तिनं मला शिकवलं आहे.
मृणाल ठाकुरनं त्या मुलीला दत्तक घेतलं असं तुम्हाला वाटत असेल की तिनं या 8 वर्षांच्या मुलाला दत्तक घेतलं आहे. तर तिनं त्या मुलीला दत्तक घेतलेलं नाही किंवा तिला मृणालनं जन्म दिलेला नाही. ही मुलगी बालकलाकार कियारा खन्ना आहे. मृणालनं कियारासोबत दाक्षिणात्य कलाकार नानीच्या ‘हाय नन्ना’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात मृणालनं यशना ही भूमिका साकारली होती आणि कियारानं ‘माही’ ही भूमिका साकारली होती.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला स्वत: कियारानं शेअर केलं आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडीओत मृणालनं लाल रंगाच्या हार्ट कमेंट करत शेअर केले आहेत.
हेही वाचा:
धुमधडाक्यात प्रेमविवाह, काही तासांत नवरीवर कुऱ्हाडीनं वार
कालच 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली, लाडकी बहीण योजना पुढची 5 वर्षे चालेल
बांग्लादेशातील व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद; केंद्र सरकारचा निर्णय