आयपीएल 2026 स्पर्धेच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.e सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना दोन परदेशी खेळाडूंवर बंदीची शक्यता निर्माण झाली आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज आणि श्रीलंकेचा अष्टपैलू यांनी ऐनवेळी पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेत आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद चिघळला आहे.

या घडामोडींमुळे मधील फ्रँचायझींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विशेषतः रावळपिंडी पिंडीज संघाचे मालक एहसान ताहिर यांनी या दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. (IPL) त्यांच्या मते, स्पर्धा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर संघ सोडणे ही केवळ करारभंगाची बाब नसून, लीगच्या प्रतिमेलाही धक्का देणारी कृती आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित खेळाडूंवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुझरबानी आणि शनाका यांच्यावर काही काळासाठी बंदी किंवा दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल संघांनीही आपल्या स्क्वॉडमध्ये बदल केले आहेत. शनाकाला ने दुखापतग्रस्त याच्या जागी संधी दिली आहे. तर मुझरबानीला ने संघात स्थान दिले आहे. (IPL) त्याला याच्या रिप्लेसमेंट म्हणून घेतले गेले आहे.याचदरम्यान, पीएसएल स्पर्धेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज देखील पीएसएल सोडून कडून खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंचा ओघ आयपीएलकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
या सर्व घडामोडींमध्ये पीएसएल स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा केवळ कराची आणि लाहोरमध्ये मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याची शक्यता वर्तवली जात असून, उद्घाटनाचे रंगारंग कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. (IPL) एकूणच, आयपीएल आणि पीएसएल या दोन मोठ्या टी-२० लीगमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा तणाव निर्माण झाला असून, त्याचे परिणाम आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?