लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल ‘ही’ नोंद
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच (Yojana)राज्यात राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीनं अनेकांनाच भांडावून सोडलं आहे. तिथं विरोधक सत्ताधारी महायुतीविरोधात लढण्यासाठीची रणनिती आखत असतानाच इथं सत्ताधारी पक्षांकडून राज्यातील जनतेचा, समाजातील प्रत्येक घटकाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच धर्तीवर मागील काही दिवसांमध्ये महायुतीच्या वतीनं बहुचर्चित योजनांची घोषणा करत त्यांचा शुभारंभही करण्यात आला. यातील एक योजना म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना(Yojana) आर्थिक सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली असून, नुकतंच या योजनेत सहभागी असणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार आतापर्यंत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोट्यवधी अर्थांची माहिती समोर आली आहे. पण, या सर्वच अर्जांमधून सर्वांनाच योजनेत नमूद करण्यात आलेली रक्कम मिळेल असं नाही. कारण, ही रक्कम मिळण्यासाठी अर्जावर काही गोष्टींची नोंद असणं महत्त्वाचं ठरत आहे.
अर्ज पूर्ण आहे की प्रलंबित?
Pending Status – पेंडिंग अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास सदर अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं.
Reject Status – अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द असा शेरा असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल्याचं लक्षात घ्यावं.
Review Status – अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे असं समजा.
Approval Status – हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दर्शवतो.
वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळते. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं.
अर्ज प्रलंबित विंका पुनरावलोकन टप्प्यांमध्ये असला तर निधी येण्यासाठीची प्रतीक्षा आणखी वाढत असून, अर्ज रिजेक्ट म्हणजेच रद्द झाल्यास मात्र खात्यावर कोणतीही रक्कम जमा होत नाही. राहिला मुद्दा एखादा अर्ज प्रलंबित का राहतो याविषयीचा, तर यामागं काही कारणं आहेत.
अनेकदा अर्ज भरताना काही चूका झालेल्या असतात. पण, अर्ज भरताना काहीही चूक न होताही अर्ज प्रलंबित दिसत असल्याच अर्जदारांनी चिंता करू नये. हा अर्ज पुढील प्रक्रियेतून जात असून, तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळंही Pending Status दाखवलं जातं.
कसं कळेल अर्जाचं स्टेटस?
मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करा
-अॅप सुरु करून त्यात लॉगइन करा.
-अर्डाचा क्रमांक किंवा अर्जदार महिलेचं नाव टाकून Get Status वर क्लिक करा.
-तुमच्यासमोर अर्जाच्या स्टेटसचे तीन पर्याय दिसणार असून, तिथं तुम्ही नेमकं स्टेटस पाहू शकता.
हेही वाचा:
विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा: “माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई”
वजन वाढवण्याची भीती न करता पांढरे लोणी खा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा सुरुवात