ऑलिम्पिकनंतर भारताच्या बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा
श्रीकांत किदांबी : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज शेवटचा दिवस(olympics) आहे. भारताने यंदा आतापर्यत ६ पदक खात्यामध्ये जमा केले आहेत. यंदा भारताचे ११७ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये भारताचे २ पुरुष बॅडमिंटनपटू, एक महिला बॅडमिंटनपटू, भारतीय पुरुष जोडी, महिला बॅडमिंटन जोडी अशा प्रकारे बॅडमिंटन स्पर्धेसाठी तुकडी पाठवण्यात आली होती.
भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी याला या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये(olympics) यंदा जाण्याची संधी मिळाली नाही. मागील काही ऑलिम्पिकमध्ये त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रीकांत किदांबीने ऑलिम्पिक संपताच त्याचा साखरपुडा उरकला आहे.
श्रीकांतने त्याच्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्याने प्रसिद्ध स्टायलिश श्रव्य वर्माशी साखरपुडा केला आहे. दोघांनी आपापल्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती ‘हो’ म्हणाली आणि आता आम्ही आमच्या दोघांची कायमची कथा लिहिण्यास तयार आहोत.” त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक स्टार खेळाडूंनी श्रीकांत किदांबीचे त्याच्या पोस्टवर कमेंट्सद्वारे अभिनंदन केले. बॅडमिंटन स्टार एचएस प्रणॉयने लिहिले, “तुम्हा दोघांचे अभिनंदन.” याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही कॉमेंटमध्ये अभिनंदन केले आहे. याशिवाय त्यांना इतर अनेक अभिनंदनाचा वर्षाव झाला.
किदांबी श्रीकांत हा एक अनुभवी बॅडमिंटनपटू आहे, त्याचबरोबर तो काही वर्षांआधी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याच्या नावावर अनेक पदक आणि टायटल्स आहेत. मागील कित्येक वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
हेही वाचा:
काय सांगता! नात्यात प्रेम वाढवण्यासाठी जोडीदाराशी ‘हे’ खोटं बिनधास्त बोला?
पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! इनोव्हा कार नदीत कोसळून 9 ठार, दोनजण बेपत्ता
सोनियाजींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही भांडे घासायला गेलता का?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका