‘फौजी’ चित्रपटातून प्राजक्ता गायकवाड सलामी ठोकणार, ३० ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शन

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची ज्योत तेवत ठेवणारा ‘फौजी’ (army) हा मराठी चित्रपट 30 ऑगस्ट रोजी राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची कथा दोन जवानांच्या देशसेवेवर आधारित असून, त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची गाथा यात पोटतिडकीने मांडण्यात आली आहे. सौरभ गोखले, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार यांच्यासह प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट (army) घनशाम येडे यांनी लिहिला, दिग्दर्शित केला असून निर्मितीही केली आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या घनशाम येडे यांचा हा चित्रपट निर्मिती क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते युवा पिढीला देशसेवेची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘फौजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रेक्षक या चित्रपटाचे आतुरतेने स्वागत करण्यास सज्ज आहेत.

हेही वाचा:

ऑलिम्पिकनंतर भारताच्या बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा

काय सांगता! नात्यात प्रेम वाढवण्यासाठी जोडीदाराशी ‘हे’ खोटं बिनधास्त बोला? 

पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! इनोव्हा कार नदीत कोसळून 9 ठार, दोनजण बेपत्ता