कागलचं राजकारण पेटलं मुश्रीफांनी विरोधी नेत्याची औलाद काढली
माजी आमदार संजय घाटगे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना (eyebrows)उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच पेटले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट विरोधकांची औलाद काढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते समरजीत घाटगे यांनी शड्डू ठोकला आहे.कागल विधानसभा मतदारसंघात लिंगनूर येथे विविध विकास कामांचा उद्घाटन(eyebrows) सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थित होती.
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत त्यांची औलाद काढली. काम न करता नारळ फोडणाऱ्या औलादी तालुक्यात तयार झाल्या आहेत. काम न करता नारळ फोडणारे तयार झालेत, असे त्यांनी म्हटले आहे.माजी आमदार संजय घाटगे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत संजय घाटगे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर मला दोन ते तीन दिवस खूप त्रास (eyebrows)दिला गेला. मात्र, घाटगे यांनी कोण त्रास देतंय, याबाबतचा स्पष्ट खुलासा त्यांनी केला नाही.
दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे विरोधकांना औलादी असे संबोधल्यानंतर कागल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या विरोधात असणारे भाजप नेते समरजितसिंह घाटगे काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा :
थंड पाण्याने अंघोळ केल्याने वजन कमी होईल का? तज्ज्ञांचे मत काय?”
“भारत-श्रीलंका वनडे मालिका: पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर न झाल्याने पहिला सामना राहिला टाय”
‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज