कोल्हापुरात अपक्षांनी भाजप-शिवसेनेचा फास आवळला, 10 पैकी 6 मतदारसंघावर दावा

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच गटातटावर विभागला आहे. (top war)गेल्या पाच वर्षात झालेल्या राज्यातील राजकारणामुळे हे गट तट लोकसभेला एकत्र आलेत. पण आगामी विधानसभा निवडणूक याच गटातटाची अस्तित्वाची लढाई बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अनेक जागांवर चांगलीच रस्सीखेच निर्माण होत असताना अपक्ष आमदारांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा फास आवळायला सुरुवात केली आहे. दहा पैकी सात मतदारसंघावर अपक्ष आमदारांनी दावा केला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना शिंदे गटापुढे उमेदवारीवरून चांगलाच पेच निर्माण झाला आहे.

भाजपचे सहयोगी सदस्य आणि इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत त्यांनी आपला राजकीय वारसदार घोषित केला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून पुत्र डॉ. राहुल आवाडे यांची उमेदवारीची घोषणा केली आहे. आमदार प्रकाश आवाडे हे महायुतीत आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. राज्यस्तरावर शिवसेना आणि भाजप यांच्यात उमेदवारीच्या जागावाटापावरून चर्चा सुरू आहे.

मात्र या चर्चेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील अपक्षांना दुय्यम वागणूक दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यातील अपक्षांनी भाजप आणि शिवसेनेवर दबाव वाढवला आहे. (top war)आमदार आवाडे यांनी आपण उमेदवारीसाठी कोणाच्या दारात जाणार नसून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून उमेदवारीची ऑफर आल्यास ती आम्ही स्वीकारू असे देखील आवडे म्हणाले आहेत. पण अपक्ष निवडणूक लढवायची झाल्यास शिरोळ हातकणंगले आणि इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.

तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सावकार विनय कोरे यांनी देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर दबाव वाढवला आहे. पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी आपल्या पक्षासाठी राज्यात 15 जागांची मागणी केली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात चार जागांवर दावा केला आहे. पन्हाळा शाहूवाडी, चंदगड,करवीर आणि हातकणंगले मतदारसंघावर दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या (top war)मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देखील कडक शब्दात सुनावले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांपैकी एक खासदार हा जनसुराज्य पक्षाने निवडून दिलेला आहे. त्यामुळे महायुतीने सन्मानाने जागा द्याव्यात असा इशाराही विनय कोरे यांनी दिला आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आणि शिवसेना शिंदे गटाची सहयोगी सदस्य असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील आतापासूनच महायुतीवर दबाव वाढवला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या तीन अपक्ष आमदारांनी आतापासूनच भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जागावाटपावरून दबाव वाढवला आहे. या तीन नेत्यांची बंडखोरी निश्चित मानली जाते.

हेही वाचा :

थंड पाण्याने अंघोळ केल्याने वजन कमी होईल का? तज्ज्ञांचे मत काय?”

“भारत-श्रीलंका वनडे मालिका: पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर न झाल्याने पहिला सामना राहिला टाय”

‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज