शिंदे गटाकडून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा, म्हणाले…
मुंबई : महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. महायुती(Alliance) हा शब्द गोंडस आहे, मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे. रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण त्या चालू आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे हे आपण पाहू शकतो. शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय.
कारण जागा वाटपात आता अडचण होईल. किंबहुना अजित पवार (Alliance)यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीतील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्या मारामाऱ्या होतील, एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, त्यांच्या या जागा वाटपाच्याचर्चेत खूनखराबा होऊ नये, या अपेक्षा करूया असेही ते म्हणाले.
मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलंय. त्यामुळे महायुतीतील वाद थेट मुद्यावरून गुद्यावर पोहोचला असल्याचे चित्र आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, सध्या मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे. ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे हे पीडब्ल्यूडी, सार्वजनिक बांधकाम खात नगर विकास खात या शिंदे गटाच्या एटीएम मशीन झाल्या आहेत. सोबतच सरकार हे केवळ पैशाच्या मागे लागले असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय.
विधानसभेची मुदत संपत आलेली आहे. पण नवाब मलिक यांच्या विषयी झालेली कारवाई ही राजकीय सुडापोटी झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही लोकांवर सातत्याने पुराव्यांशी बोलत होते. मात्र, आज नवाब मलिक सरकारमध्ये आहे. प्रश्न इतकाच आहेत जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक नीतिमत्तेची ओळख देऊन एक पत्र लिहिलं होतं.
नवाब मलिकांबाबत अजित पवार यांना लिहिलेलं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी जाहीर करावं, की नवाब मलिक यांच्यावरील सर्व खटले खोटे आहेत. फडणवीस हे खोटं बोलतात ते खोटारडे नंबर एक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना ते पत्र पाठवीन, ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे. ते राष्ट्रभक्तीचा ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे.
नवाब मलिक यांना अटक करण्यासाठी आम्ही तपास यंत्रणेवर दबाव आणला होता हे त्यांनी मान्य करावे. नवाब मलिकांमुळे एकनाथ शिंदे यांच्या दाढीला आग लागली आहे. लाडकी बहीण नाही तर लाडके नवाब मलिक झालेले आहे. तुम्ही मांडीवरच घेऊन बसला आहे. हे ढोंगी राष्ट्रभक्त असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा :
वरुण ‘यू लव्ह आय’; पण मला मुली आवडत नाहीत?
बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय
राज्यात लेकीनां सुरक्षा देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या; सुप्रिया सुळेंचा सरकारवर संताप